फ्रान्समधील AI शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचं भाषण

AI अॅक्शन परिषदेत सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) इतर तंत्रज्ञानापेक्षा खूप वेगळे आहे. मात्र, सावधगिरी बाळगण्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) खूप वेगाने विकसित होत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

AI च्या माध्यमातून सर्वांचे भविष्य उत्तम बनविण्यासाठी भारत अनुभव आणि कौशल्याच्या आधारे सातत्याने प्रयत्नशील राहील.

एआयच्या डेटा गोपनीयतेसाठी, कायदेशीर बाजू भक्कमपणे तयार करण्यातही भारत आघाडीवर आहे.

भारताने 1.4 अब्जाहून अधिक लोकांसाठी अतिशय कमी खर्चात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आभार मानले. ‘या शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि त्याचे सह-अध्यक्ष म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा आभारी आहे.

एआयच्या सहाय्याने आपली अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि आपल्या समाजालाही आकार देण्यात येत आहे. या शतकात एआय मानवतेसाठीचा नवा अध्याय लिहित आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 11-02-2025