चिपळूण : मुंबई – गोवा महामार्गांवर कळंबस्ते येथे धामणंदकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या एका गाडीने धडक दिल्याने रेहेळ भागाडी येथील साहील बाईत हा तरुण किरकोळ जखमी झाला. हा अपघात मंगळवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला. कळंबस्ते-धामणंदकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो. मात्र, वाहनांच्या वर्दळीमुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचालकांची नेहमीच अडचण होते. अशातच आत्तापर्यंत छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक संदर्भात योग्य ती व्यवस्था करावी. अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल, अशी भूमिका कळंबस्ते ग्रामस्थ व रिक्षा व्यावसायिकांनी घेतली आहे. दरम्यान या अपघाताबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस तपास सुरू होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 12/Feb/2025














