चिपळूण शहरात दिशा मार्ग फलक लावण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण नगर परिषद प्रशासनाने संपूर्ण शहरात एक दिशा मार्ग फलक लावावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी केली आहे. नगर परिषदेसमोरील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलाकडून दुचाकीबरोबरच मोठी वाहने चुकीच्या मार्गाने येत असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणापासून जवळच बस थांबा आहे. त्यामुळे रहदारी मोठी असते. नवीन वाहनचालकांना एकेरी मार्गाची कल्पना नसते. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने जेथे जेथे अपघाताची शक्यता आहे त्या ठिकाणी एक दिशा मार्ग फलक बसवावेत. एक दिशा मार्गावर चुकीच्या पद्धतीने वाहतूक सुरू असल्यास पोलिस प्रशासनामार्फत अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही दलवाई यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 12/Feb/2025