Maharashtra Weather Update : किंचित थंडी जाणवण्याची शक्यता

मुंबई – Maharashtra Weather Update : उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अटकाव झाल्याने मुंबईतील थंडी कमी झाली होती. मात्र, गार वाऱ्याचा अडथळा दूर झाला असून, हे गारे वारे नाशिक, ठाणे, नवी मुंबई व मुंबईच्या दिशेने वाहणार आहेत.

त्यामुळे पारा चढलेल्या मुंबईच्या तापमानात घट होणार असून, पुढील काही दिवस मुंबई – ठाण्यात ‘थंडा थंडा कुल कुल’ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच हवेचा दर्जा आता सुधारला आहे.

शेवटच्या आठवड्यापासून विशेष खास अशी थंडी जाणवली नाही. पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा जवळपास १ ते २ने अधिक राहूनही महाराष्ट्रात, चढ – उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत केवळ गारवा जाणवला.

आता मुंबई शहर, ठाणे, खान्देश, नाशिकमध्ये तसेच अकोला, छ. संभाजीनगर जिल्ह्यात १३ फेब्रुवारीपर्यंत व १७ व १८ फेब्रुवारी रोजी किंचित थंडीची शक्यता जाणवते. उर्वरित महाराष्ट्रात विशेष बदल जाणवणार नाही, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

किमान तापमान
मुंबई १८.८
अलिबाग १७.५
रत्नागिरी २०.२

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 12-02-2025