चिपळूण : गोविंदगडावर १९ फेब्रुवारीला ऐतिहासिक व पुरातन वस्तूंचे प्रदर्शन

चिपळूण : शहरानजीकच्या गोवळकोट येथील राजे सामाजिक प्रतिष्ठान व नागरिकांच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त गोविंदगडावर प्रतिष्ठानच्या संग्रहातील ऐतिहासिक व पुरातन वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध कार्यक्रमांनी शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे, गोवळकोट नागरिक व राजे प्रतिष्ठानतर्फे दहा वर्षांपासून शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी गडावर विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. १९ रोजी सकाळी ७ वा. ऐतिहासिक दुर्ग गोविंदगड पूजन, गडदेवता श्री देवी रेडजाई मातेचे पूजन, ध्वज पूजन, सकाळी ९.३० वा. शिवप्रतिमेचे पूजन, आरती, सायंकाळी ४ वा. मान्यवरांचे स्वागत, विविध ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहेत. सायं. ६:३० वा. काडवली येथील रोहित आग्रे यांचे शिवचरित्रपर कीर्तन होणार आहे. सकाळी १० वा. पासून प्रतिष्ठानच्या संग्रहातील ऐतिहासिक व पुरातन चुना, विटा, कौलांचे तुकडे आदी वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. सर्वांनी कार्यक्रमांस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 12/Feb/2025