राजापूर : राजापुरातील राजंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनीने किफायतशीर दरामध्ये कृषी अवजारांचे वितरण केले. या कंपनीद्वारे गोविंदराव निकम कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, मांडकी पालवण येथे झुडपांसहीत वनस्पती खोड नाश करणारी किसान क्राफ्ट कंपनीची स्टबल मूव्हर मशीन देण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले.
राजंगा कंपनीचे शेअर डॉ. निखिल चोरगे यांनी खरेदी करून शेतकऱ्यांच्यादृष्टीने सदैव कर्तव्यतत्पर असणाऱ्या या शेतकरी कंपनीसाठी वेळोवेळी गरजेनुरूप सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी मांडकी पालवणचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, संस्थेचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, राजंगा कंपनीचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, उपाध्यक्ष हरेंद्र बाणे तसेच कॉलेज पदाधिकारी व कर्मचारी जोखी उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या सहकायनि स्थापन करण्यात आलेली राजापूर येथील राजंगा फार्मर प्रोड्यूसर या शेतकरी उत्पादक कंपनीतून वेळोवेळी सभासद शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कंपनीमार्फत शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक अवजारे, औषधे, बी बियाणे, खते, कृषी प्रक्रिया उपयुक्त विविध साधन सामुग्री व प्रक्रिया अवजारे तसेच शेती विषयक सल्ला व मदत वेळोवेळी केली जाते. डॉ. चोरगे हे कंपनीचे सभासद झाले आहेत. त्यांनी कंपनीवर दाखविलेला विश्वास भविष्यात सार्थ ठरवू असे राजंगाचे केले अध्यक्ष गोंडाळ यांनी सांगितले.