रत्नागिरीच्या टपाल विभागात ९५ पदांसाठी भरती

रत्नागिरी : रत्नागिरीच्या टपाल विभागात ग्रामीण डाक सेवकाची ९५ पदे भरायची आहेत. त्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन रत्नागिरीच्या डाकघर अधीक्षकांनी केले आहे.

रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवकांची एकूण ९५ रिक्त पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठीची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन सुरू झाली असून ती येत्या ३ मार्चपर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवरांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावेत, असे सूचित करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 12/Feb/2025