चिपळूण : शहरातील पागमळा येथील श्री साईबाबा मंदिराचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन गुरुवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी साई मित्रमंडळाच्या वतीने उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी ६.३० वा. काकड आरती आणि साई अभिषेक, ७ वा. अभ्यंग स्नान, दु. १२ वा. मध्यान्ह आरती, १ वा. साईप्रसाद (भंडारा), सायंकाळी ६.३० वा. अडरे येथील केदारनाथ भजन मंडळाचे हभप रवींद्र महाराज सुतार यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 12/Feb/2025














