संगमेश्वर : कसबा येथील कर्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील हेमाडपंथी, पांडवकालीन, प्राचीन अशा श्री देव कर्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी असा साजरा करण्यात येणार आहे.

यामध्ये दि. २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी ८ वा श्रींची पूजा व अभिषेक, रात्री ७.३० वाजता आरती मंत्रपुष्प होईल. २५ रोजी मन्यूसूक्त याग होणार आहे तर रात्री कीर्तन असेल. २६ रोजी महाशिवरात्री निमित्त जत्रा भरणार आहे. सायंकाळी ६ वाजता कीर्तन, तर रात्री १० वा श्रींचा पालखी सोहळा, २७ ला रात्री कीर्तन, तर २८ रोजी रात्री ९.३० वाजता फक्त हरिनाम भजन मंडळ रत्नागिरी यांचे भजन होईल. रात्री १२ नंतर लळीत होऊन उत्सवाची सांगता होईल.

यावर्षी कीर्तन सेवेला पनवेलचे ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. नंदकुमार कर्वे बुवा असतील तर साथीला संवादिनी चैतन्य पटवर्धन, तबला केदार लिंगायत असणार आहेत. महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 12/Feb/2025