लांजा : तालुक्यातील कोळंबे येथे राहणाऱ्या १९ वर्षीय गंधर्व दिनेश जठार याने लांजा तालुक्यातील पहिला पखवाज विशारद होण्याचा मान मिळवला आहे.
गंधर्व सध्या पुणे येथे आर्किटेक्चर चे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील दिनेश जठार हे व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असले तरी एक हौशी भजनी बुवा म्हणून त्यांची ओळख आहे. कलेचा वारसा आपल्या वडिलांकडून घेत गंधर्व सुमारे ७ वर्षांपासून पखवाज वाजवण्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या गंधर्वने तितक्याच आवडीने आणि मेहनतीने हि कला जपली आहे. आज तो पखवाज विशारद पूर्ण परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.
कुडाळ येथील महेश सावंत (पखवाज अलंकार) यांच्याकडे देखील गंधर्वने पखवाज वाजवण्याचे शिक्षण घेतले आहे. सुमारे ७ वर्षे शास्त्रोक्त शिक्षण घेत गंधर्वने आजवर सर्व परीक्षा दिल्या आहेत. वडील दिनेश जठार आणि कुटुंबीय तसेच श्री परशुराम गुरव व श्री मंदार जाधव प्रभानवल्ली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे गंधर्वने आवर्जून सांगितले.
इतक्या लहान वयात तालुक्यामध्ये पहिला पखवाज विशारद होण्याचा बहुमान गंधर्वने मिळवला असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 12-02-2025














