रत्नागिरी : दोन तरुणांची आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील तरवळ बौद्धवाडी आणि पाली-मराठवाडा येथील दोन तरुणांनी अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी २ वा. कालावधीत घडली आहे.

विशाल अशोक पवार (३६, रा. तरवळ बौद्धवाडी, रत्नागिरी) आणि जितेंद्र सुनील सावंत (३३, रा. पाली मराठवाडा, रत्नागिरी) अशी दोन घटनांत गळफास घेत आत्महत्या केलेल्या दोन तरुणांची नावे आहे.

याबाबत विशालचे वडील अशोक पवार यांनी तर जितेंद्रच्या चुलत भावाने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, मंगळवारी सकाळी अशोक पवार यांचा मुलगा विशालने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या हॉलमध्ये माळ्याच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली तर जितेंद्र सावंतने अज्ञात कारणातून आपल्या घराच्या मागील बाजुच्या पडवीमध्ये छताच्या लोखंडी गजाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या बाबत मृतांच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 13/Feb/2025