दापोली : दापोलीतील Dapoli काहीजणांनी गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केली. एका समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे गाणे व्हायरल करण्यात आले होते. याचे तीव्र पडसाद शहरवासियांमध्ये उमटले. बुधवार दि. २ रोजी दापोलीतील शिवप्रेमी आणि नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा झाले होते. या वेळी ज्यांनी ही अवहेलना केली त्यांना देखील बोलवण्यात आले होते. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने अवहेलना करणाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले. अवहेलना करणाऱ्यांनी शिवरायांची माफी देखील मागितली.
यावेळी दापोली पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जमावाने शेकडो लोकांच्या सह्यांचे निवेदन पोलिसांना देऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 03/Oct/2024














