रत्नागिरी : एमआयडीसी येथील दुकानात चोरी

रत्नागिरी : शहनाजीकच्या एमआयडीसी येथील ऑटोसिटी कार वॉश डिटेलिंग दुकानातून अज्ञाताने रोख २ हजार ५०० रुपये चोरुन नेले. ही घटना रविवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या कालावधीत घडली आहे.

या प्रकरणी गौरव संजय नलावडे (२७, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचे एमआयडीसी येथे वॉशिंग सेंटर असून अज्ञाताने त्यांच्या दुकानातून रोख २ हजार रुपये लांबवले.

चोरीच्या या घटनप्रकरणी अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 13/Feb/2025