चिपळूण : चिपळूण रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवासात १ लाख रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीस गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली.
या प्रकरणी सोमवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अलिना लालू (वय २३, केरळ) यांनी दिली. अलिना लालू या जामनगर-तिरुनेलवेली एक्स्प्रेसने प्रवास करीत होत्या. त्या बसलेल्या आसनावर ठेवलेली लॅपटॉपची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 13/Feb/2025












