उत्तर रत्नागिरीत परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

रत्नागिरी : पावसाचा जोर ओसरला असताना मंगळवारी संध्याकाळी north रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. दक्षिण रत्नागिरीतील तालुके मात्र कोरडे होते. मंगळवारी संध्याकाळी मंडणगड. दापोली, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या पाच तालुक्यात विजासह गडगडाटी पाऊस झाला. संगमेश्वर – देवरुख भागात जोरदार पाऊस झाला. या भागात विजांच्या जोरदार कडकडाटात पावसाने हजेरी लावली. मंडणगड तालुक्यात १.२५ मिमी आणि दापोलीत १.७१ मिमी पावसाची नोंद झाली. खेड, चिपळूण, आणि संगमेश्वर तालुक्यात पावसाचा जोर होता. खेड तालुक्यात १९.७१ मिमी चिपळुणात ११ मिमी आणि संगमेश्वर तालुक्यात १७.५० मिमी पावसाची नोंद झाली. लांजा तालुक्यातही हलक्या पावसाने हजेरी लावली होती. अन्य तालुक्यात पाऊसाने पाठ फिरविली. त्यामुळे तापमान वाढले. मंगळवारी उत्तर रत्नागिरीत पाऊस झाल्यानंतर बुधवारी सकाळी मात्र पावसाने उघडीप घेत कोरडे वातावरण निर्माण केले. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जून पासून ४२०० मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 03/Oct/2024