रत्नागिरी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महात्मा गांधी जयंती निमित्ताने सेवानिवृत्तांच्या संघटनेने जळगाव येथे साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीतील Ratnagiri सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाबाहेर शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा दिल्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी याच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटना, अमरावती (महाराष्ट्र राज्य) यांच्यामार्फत जळगाव येथे साखळी उपोषण सुरु झाले आहे. या उपोषणास समर्थन देण्यासाठी संघटनेच्या जिल्हा शाखेमार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जलभवन साळवी स्टॉप येथे निवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी शासनाच्या धोरणा विरोधात घोषणा दिल्या. निवृत्त अधिकारी व संघटनेचे रत्नागिरी शाखा अध्यक्ष सतीश सोहनी, कार्याध्यक्ष कमलाकर गावखडकर, उपाध्यक्ष अशोक बंडवे, सुरेश सुरेश बने, सुधीर काळे, सदस्य प्रशांत सुर्वे यांच्यासह निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 03/Oct/2024














