रत्नागिरी : रत्नागिरीची सुकन्या सोनाली चंद्रकांत जाधव हीने २०१६ मध्ये हवाई सुंदरी होण्याचा मान प्राप्त केला. गेल्या सात वर्षांपासून यशस्वी गगनभरारी घेत तिने नुकत्याच एका सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये देखील सोनालीने ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५’ किताब पटकावत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सोनाली सध्या एयर होस्टेस लीडर पदावर कार्यरत आहे. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या मिस मद्रासी इंडिया स्पर्धेत सोनाली जाधव हीने सहभाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत सोनालीने ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५’ किताब पटकावत मुकुट जिंकला आहे. या किताबाने रत्नागिरीसह महाराष्ट्राचे नाव उंचावले असल्याने सोनालीच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल तिचे चौहोबाजूंनी विशेष कौतुक केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 13/Feb/2025














