खेड : तालुक्यातील बोरघर कातकरवाडीतील किसन हौशा पवार या ५९ वर्षीय वृद्धाला फिट्स येऊन मृत्यू झाल्याची घटना ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली पवार हे आपल्या राहत्या घराच्या अंगणामध्ये बसलेले असताना त्यांना अचानक फिट्स आल्याने औषधोपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले असता औषधोपचारादरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 13/Feb/2025














