रत्नागिरी : Ratnagiri Fishring वातावरणातील विपरित परिणामुळे यंदाच्या मासी हंगामातील सुमारे २० ते २२ दिवस वाया गेले. गुरुवारपासून वातावरण पोषक असल्याने ९५ टक्के नौका मासेमारीसाठी दर्यावर स्वार झाल्या आहेत. बांगडा, गेजर, सौंदाळा, असा बंपर रिपोर्ट मच्छीमारांना मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी हंगाम सुरू झाला. परंतु पावसाळी वातावरणामुळे तो पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. मच्छीमारांनी जीवावर उदार होऊन मासेमारी हंगामाला सुरवात केली; परंतु बदलत्या हवामानामुळे मासेमारीला अनेक वारंवार ब्रेक लागत होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पर्ससीन मासेमारीचा हंगाम सुरू झाला; परंतु परतीचा पाऊस असल्याने गेले २२ दिवस मासेमारी ठप्प होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस होत असल्याने मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. गेले तीन दिवस पावसाने उघडीप दाखवली आहे.
स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पोषक वातावरण असल्याने बंदरात नांगरून ठेवलेल्या एकूण ६० टक्के मच्छीमारी नौका गुरुवारपासून पुन्हा समुद्रावर स्वार झाल्या आहेत. ९५ टक्के मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेल्याचे मच्छीमारांनी सांगितले, खऱ्या अर्थाने आता हंगाम सुरू झाला असून, रिपोर्टही चांगला मिळत आहे. अनेक मच्छीमारांना बांगडा गेजर,सौंदाळा, सुरमई, झिंगा, म्हाकुळ असा रिपोर्ट लागत आहे. आता त्यामुळे मच्छीमारांमध्ये चांगलाच उत्साह आहे.
खलाशी परतले
अनेक मच्छीमारांच्या नौकांवर परराज्यातील नेपाळी गुरखा, बेळगाव, कर्नाटक आदी भागांतील लोक खलाशी म्हणून काम करतात, त्यांन आगावू रक्कम देऊन खलाशी म्हणून ठेवले जाते. त्यांची ने-आण करण्याची जबाबदारी नौका मालकांची असते. त्यांची बडधास्त ठेवली तरच ते काम करतात अन्यथा दुसऱ्या मालकाकडे जातात. त्यामुळे मच्छीमारांचे खलाशी परतल्यामुळे हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 03/Oct/2024














