खेड : राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

खेड : राज्याचे गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषधे प्रशासन विभाग राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. शिबिर सकाळी १० ते १ या वेळेत शिवतेज आरोग्य सेवा संस्था, वाकण, खेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन प्रसाद शेट्ये, पुष्पेन दिवटे, राजू आंब्रे आणि रोहन भोजने यांनी केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 14/Feb/2025