संगमेश्वर : ‘एसटी महामार्गावर उभ्या करू नका’

संगमेश्वर : एसटीच्या गाड्या रेल्वेस्टेशनचा फलक लावून रेल्वेस्थानकाकडे येतात; मात्र त्यांना रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्येच उभ्या न करता थेट महामार्गावर लावल्या जातात. त्यामुळे रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बस उभी करण्यासाठी पुरेशी जागा नाही, असे चालक व वाहकांचे मत आहे. त्यामुळे रेल्वेप्रशासनाकडून जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दोन्ही प्रशासनात समन्वय असेल तर यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असे प्रवाशांचे मत आहे.

एसटी बसमध्ये जागा पकडण्यासाठी रेल्वेतून उतरून वृद्ध आणि गरोदर महिलांसह प्रवाशांना धावत यावे लागते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यात लक्ष घालून एसटी बस रेल्वेस्थानकापर्यंत जाईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 14-02-2025