संगमेश्वर : संगमेश्वर-सोनवी नाका येथे रिक्षा चालक आणि एसटी चालक यांच्यामध्ये झालेल्या मारहाणीमध्ये दोघेही जखमी झाले असून परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिद्र प्रभू सोनावणे हे एसटी महामंडळ देवरुख आगार येथे चालक म्हणून कामाला आहेत. ते बुधवारी सायंकाळी संगमेश्वर एसटी स्टैंड येथून एसटी (क्र. एम एच २० बी एल २५८५) संगमेश्वर ते कानरकोंड अशी प्रवाशांना घेऊन जात असताना संगमेश्वर एसटी स्टँड येथून गाडी बाहेर काढत असताना समोर ट्रैफिक असल्यामुळे गाडी ठेवून थांबले होते. यावेळी रिक्षाचालक नरेंद्र शिरगावकर यांनी गाडीची धूळ उडत आहे. गाडी रेस करू नको, असे बोलून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चालक सीटवर बसलेले असताना खिडकीवर ठेवलेल्या त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर काठीने मारून ते बसमधून खाली उतरले असता त्यांच्या डाव्या पायावर व मांडीवर डोक्यात काठीने मारहाण करून दुखापत केली.
तर या बाबत नरेंद्र शिरगावकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, ते संगमेश्वर एसटी स्टैंड येथील रिक्षा स्टॅन्ड येथे पहिल्या नंबरमध्ये रिक्षा लावून रिक्षामध्ये बसले होते. एसटी स्टँड येथून संगमेश्वर ते कानरकोंड अशी जाणारी एसटी मुंबई-गोवा मार्गावर येत असताना महामार्गावर ट्रॅफिक असल्याने ही गाडी चालू ठेवून एसटी रेस करून उजव्या सायलेन्सरमधून जोरात धूर काढला. हा धूर रिक्षाचालक नरेश शिरगावकर यांच्या अंगावर उडाला तसेच एसटीमधील चालकाने चिव्याच्या काठीने त्यांच्या हातावर मारून तसेच त्यांचे मित्र राजाराम गुडेकर यांना कानशिलात लगावून शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे परस्परविरोधी करण्यात आलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 14-02-2025














