लांजा : अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लांजा : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लांजा या प्रक्रल्पातील अंगणवाडी सेविका/मदतनीस रिक्त पदे मानधनी सेवा तत्त्वावर भरण्यासाठी संबंधित महसूल गावातील स्थानिक रहिवासी पात्र महिला अर्जदारांकडून २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज कार्यालयीन वेळेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, लांजा येथे जमा करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांनी केले आहे. माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), एकात्मिक बाल विकास सेवा योजना, लांजा येथे संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 14/Feb/2025