Dapoli : जागेचा मोबदला मिळवा म्हणून दापोलीत उपोषण

दापोली : तालुक्यातील आंजर्ले खाडीवर पूल बांधण्यासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जागेचा अद्याप मोबदला मिळाला नसल्याने अडखळ जुईकर मोहल्ला येथील ग्रामस्थ दापोली Dapoli तहसील कार्यालयासमोर दि. २ रोजी उपोषणाला बसले होते.

याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले आहे. पूल बांधताना आमच्या जमिनी सरकारने अधिग्रहित केलेल्या आहेत. मात्र १४ वर्षे उलटून गेली तरीही जमीन मालकांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. या बाबतीत सरकार दरबारी वारंवार अर्ज विनंत्या करून झालेल्या आहेत. मात्र मोबदला देण्याबाबत सरकारकडून कोणतीच हालचाल होत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 03/Oct/2024