रत्नागिरी : कंत्राटी भरती प्रक्रिया बंदच्या विरोधात डीएड, बीएडधारकांचा आंदोलनाचा पवित्रा

रत्नागिरी : राज्यशासनाने १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षकभरतीसह करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात आता डीएड, बीएड उमेदवार आक्रमक झालेले आहेत. त्यांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, रविवारी (ता. १६) रत्नागिरीत बैठकीचे आयोजन केले आहे.

रत्नागिरी हा दुर्गम जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शाळा अतिशय डोंगरकपारीत आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीच्या सोयीदेखील नाहीत. – गावात रोजगार नसल्यामुळे अनेक कुटुंबे शहराकडे स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा पट कमी झालेला आहे. जिल्ह्यात दहापेक्षा कमी पट असलेल्या ५००हून अधिक शाळा आहेत. पोर्टल शिक्षकभरती होऊनही अनेक शाळा शून्यशिक्षकी आहेत. एका विशिष्ट जिल्ह्यातील पवित्र पोर्टलला जास्त शिक्षकभरती होतात, तर एका भागातील फार कमी शिक्षकभरती होतात. अतिदुर्गम भागात शिकणाऱ्या मुलांना याचा फटका बसणार आहे.

या सर्व बाबींचा विचार करून माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी युती सरकार असतानाच १०पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा शासननिर्णय २३ सप्टेंबर २०२४ ला घेतला होता. पुन्हा एकदा युती सरकार असतानाच शिक्षणमंत्री बदलले. त्यांनी कोकणातील जागा इतर जिल्ह्यातील शिक्षकांना मिळणार नाहीत. सर्व स्थानिक शिक्षक लागतील. त्यामुळे कोकणातील शाळा सुरू राहतील. हे सर्व होऊ नये या हेतूने १० फेब्रुवारीला कंत्राटी शिक्षकभरती शासननिर्णय रद्द करण्यात आला आहे, असा आक्षेप डीएड, बीएडधारकांनी नोंदविला आहे.

मागील आठवड्यात शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती. सप्टेंबरता शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या शिक्षकांचे पगाराचे अनुदान आलेले नाही. त्यावर शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी अनुदान देऊ, असे सांगितले होते. त्यानंतर कंत्राटी शिक्षक नियुक्त्या रद्दचा निर्णय झाला. त्यामुळे पुन्हा एकदा या विषयावर शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊ, तसेच स्थानिक पालकमंत्री यांना भेटून समस्या मांडणार आहोत. सुदर्शन मोहिते, जिल्हाध्यक्ष, डीएड-बीएडधारक संघटना

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 14/Feb/2025