रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिप जिंकण्याचा मान मिळवला आहे. देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज राष्ट्रीय टेक कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत चार कोडिंग स्पर्धा, १ वेब डेव्हलपमेंट आणि १ क्विझ अशी एकूण ६ बक्षिसे मिळवत जनरल चॅम्पियनशिप मिळवली. एमआयडीसी येथील एस. पी. हेगशेट्ये कॉलेज आयोजित क्विज आयटी राज्यस्तरीय स्पर्धेतदेखील महाविद्यालयाने आपले वर्चस्व राखले. यामध्ये २ वेब डेव्हलपमेंट, १ कोडींग आणि १ गेमिंग अशी बक्षिसे मिळवली.
फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या एक्स्लेटेनिया या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी २ कोडिंग, १ क्विझ आणि १ वेब डेव्हलपमेंट अशी ४ बक्षिसे मिळवली. या ऐतिहासिक यशासाठी मेधा सहस्रबुद्धे, अनुजा घारपुरे, डॉ. विवेक भिडे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि डॉ. मकरंद साखळकर यांनी विजेत्यांचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 14/Feb/2025














