चिपळूण : तालुक्यातील अनारी येथील वरदानवाडी समाज सेवा मंडळ (मुंबई-अनारी) यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या श्री दत्त मंदिराचे उद्घाटन, कलशारोहण, प्राणप्रतिष्ठापना आणि नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन आदी कार्यक्रम १५ ते १७ फेब्रुवारी या दरम्यान अनारी वरदानवाडी येथे होणार आहेत.
दि. १५ रोजी दु. ३.०० वा. सती ते अनारी या मार्गावरून कलश आणि श्री दत्तगुरू मूर्तीचे मिरवणुकीने आगमन, दि.१६ रोजी मूर्ती धान्य निवास, वास्तूशांती तर दि. १७ रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा, कलशारोहण आणि सभागृहाचे उद्घाटन होणार आहे. दि. १६ रोजी रात्री कुंभारवाडी भजन मंडळ सावर्डे आणि दि. १७ रोजी रात्री श्री खळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी यांच्या बहुरंगी नमनाच्या कार्यक्रम होईल. या सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरदानवाडी समाज सेवा मंडळ (अनारी-मुंबई) आणि वरदानवाड़ी महिला मंडळ यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 14/Feb/2025














