चिपळूण : वालावलकर रुग्णालयात स्वादुपिंड कॅन्सरवरती इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिद्वारे शस्त्रक्रिया

चिपळूण : वालावलकर रुग्णालयात गेल्या आठवडयात तीन पेशंट स्वादुपिंडच्या कॅन्सरग्रस्त असलेले उपचारासाठी दाखल झाले होते. तीन्ही रुग्णांच्या पोटाच्या वरील भागात दुखत होते. त्यांची भूक कमी झाली होती.

वालावलकर रुग्णालयात ओपीडी विभागात तीन्ही रुगण आले असता त्यांची प्राथमिक रक्त तपासणी व सोनोग्राफी करण्यात आली. त्यामध्ये तिघ्यांचाही रक्तात बिलीरुबीना नावाचा घटक प्रचंड वाढलेला आढळून आला. रक्तातील बिलीरुबीनचे प्रमाण वाढले की कावीळ दिसू लागते. तसेच सोनोग्राफीवरती तिन्ही रुग्णांना स्वादुपिंड कॅन्सरसदृश गाठी असल्याचे आढळून आले. कॅन्सरसदृश गाठी आढळून आल्यानंतर वालावलकर रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अरुण कुरकुरे फंड योजनेतून पुढील जवळ जवळ २५ हजार रुपये पर्यंतच्या तपासण्या सीटी स्कॅन, एम. आर. सी. पी (एम. आर. आय) पेट स्कॅन, कॅन्सरच्या रक्तातील ट्युमर सिरम मार्कस, सोनोग्राफी गाईडेड स्वादुपिंडच्या गाठीतून बायोस्पी वैगरे तपासण्या सर्व रुग्णांच्या मोफत करण्यात आल्या. या सर्व चाचण्यांमुळे तीन्ही रुग्णांना स्वादुपिंडचा कॅन्सर आहे. हे लक्षात आहे.

तीन्ही रुग्णांना कॅन्सरवरील पुढील उपचारांसाठी वालावलकर रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. त्यातील एका रुग्णाला डॉ. आनंद जोशी (ग्रॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट) यांनी इ. आर. सी.पी. प्रोसिजीरद्वारा पित्ताशय नलिकेत प्लास्टिक स्टेन्ट घातला. दुसऱ्या दोन पेशेंटला कॅन्सरच्या स्वादुपिंडातील कॅन्सर गाठीमुळे पित्ताशय नलिका पूर्णपणे दबली असल्यामुळे इ. आर. सी. पी द्वारा प्लास्टिक स्टेन्ट घालता आले नाही. ह्या दोन्ही रुग्णांवर टाटा हॉस्पिटलचे डॉ. सुरज भामे इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट व डॉ. सुमेद यांनी वालावलकर रुग्णालयात येऊन पी. टी. बी. डी व मेटल स्टेन्ट ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

या प्रोसिजरमध्ये लिव्हरमधील सूज आलेल्या पित्त नलिका सोनोग्राफीच्या व कॅथ लॅब मशीनच्या मदतीने बारीक सुईने टोचल्या जातात व वरून पित्तनलिकेत मेटल स्टेन्ट बसवले गेले. या सर्व पेशेंटना वरील उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले योजने अंतर्गत पूर्णपणे मोफत झाल्या. या नंतर डॉ. श्रीपाद बाणवली (टाटा हॉस्पिटल मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली केमोथेरपी सुरु केली जाईल. वरील सर्व रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी उपचार मोफत झाल्याबद्दल वालावलकर रुग्णालयांचे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व अरुण कुरकुरे फंड योजनेचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 14/Feb/2025