Navratri : आज घटस्थापना; रत्नागिरी जिल्ह्यात ४८७ दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

रत्नागिरी : जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची सार्वजनिक मंडळांकडून तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी (ता. ३) घटस्थापनेनिमित्त जिल्ह्यात ४८७ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, तर ९० ठिकाणी फोटोपूजन, घरोघरी, खासगी, सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवांतर्गत विविध सार्वजनिक मंडळातर्फे दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन केले.

कोकणात पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरापुरताच घटस्थापना करण्यापर्यंत उत्सव मर्यादित होता. नवरात्रोत्सवात ग्रामीण भागात मंदिरामध्ये देवीला रूपे लावली जातात. ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक मंडळांकडून दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६ हजार ६२९ ठिकाणी खासगी तर १७४ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापनेच्या ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात व ग्रामीण भागात दुर्गामातेची प्रतिष्ठापना होणारे ठिकाण सजवण्यात आले आहे. मंडळांकडून सजावटही करण्यात आली आहे. रोजच्या पूजा, आरती, भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे काही ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे तर काही ठिकाणी स्थानिकांचे कार्यक्रम झाल्यानंतर गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज घटस्थापनेलाच विविध रूपातील दुर्गामातेची प्रतिष्ठापना होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 03/Oct/2024