रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा युवाशक्ती शाखेने मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजित केली आहे.
पाचवी ते दहावी शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होईल. स्पर्धेचे विषय आणि शब्दमर्यादा अशी – शालेय गट – मराठी भाषा काल आज उद्या, शब्दमर्यादा ५०० ते ७००.
महाविद्यालयीन गट – मराठी भाषा संवर्धनात युवकांचे योगदान, शब्दमर्यादा ८०० ते १२००. खुला गट- अभिजात भाषेच्या दर्जाचे शिवधनुष्य पेलताना, शब्दमर्यादा १५०० ते २०००.
प्रत्येक गटात पहिले तीन विजेते निवडण्यात येतील. विजेत्यांना रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मराठी राजभाषा दिनी (दि. २७ फेब्रुवारी) मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात येईल. स्पर्धकांनी आपल्या निबंधाची हस्तलिखित किंवा टंकलिखित प्रत शनिवार, दि. २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत श्री. अरुण तुकाराम मोर्ये, ७४, प्रतिभासदन, मु. सत्कोंडी, पो. सैतवडे, ता. जि. रत्नागिरी ४१५६१३ या पत्त्यावर पाठवावी. विजेत्यांची नावे २४ फेब्रुवारी २०२५ रोजी घोषित करण्यात येतील. तसेच विजेत्यांना त्यांच्या संपर्क क्रमांकांवर कळविण्यात येईल.
पारितोषिक वितरण समारंभाला स्पर्धक किंवा स्पर्धकांच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष हजर राहून पारितोषिक स्वीकारावे. अधिक माहितीसाठी अरुण मोर्ये (९१७५५२६६६०, ८८०५७०४५५७) किंवा अमेय धोपटकर (८८८८०३३६२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 15-02-2025














