रत्नागिरी : ऑपरेशन टायगर ने आता वेग घेतला असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत असून, आभार यात्रेच्या निमित्ताने आज शनिवार दि.१५ रोजी ते रत्नागिरीत येत आहेत. या साठी रत्नागिरी चंपक मैदान येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी विलास चाळके, राजू महाडिक आणि रोहन बने यांच्यासोबत मोठ्या संखेने उबाठा तील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करीत आहेत.
कोकणातून आता उबाठा चा सुपडा साफ होताना दिसत आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संखेने उबठातील कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 15-02-2025














