रत्नागिरी : नेवरे येथे १६ फेब्रुवारीपासून गजानन महाराज प्रगट दिन सोहळा

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने रविवार दि. १६ ते गुरूवार दि. २० फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी मंदिरात पहाटे काकड आरती, सकाळी ७.३० वाजता पंचामृती पूजा व अभिषेक, सकाळी ९ वाजता श्री गणेश याग, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू, रात्री १०.३० वाजता लावगणवाडीतील श्री गजानन महाराज नमन मंडळातर्फे बहुरंगी नमन सादर करण्यात येणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रींची पूजा, सकाळी ७.३० वाजता पालखी मिरवणूक दुपारी १२ वाजता नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता श्रींची पालखी मुक्काम, रात्री १० वाजता भजन होणार आहे.

मंगळवार दि. १८ रोजी सकाळी ७ वाजता श्रींची पूजा, सकाळी ७.३० वाजता श्रींची पालखी मिरवणूक, दुपारी १२. ३० वाजता नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता पालखी मंदिरात येईल. सायंकाळी ७.३० वा. श्रींची आरती व प्रसाद, रात्री ९ वाजता हरीपाठ होणार आहे. बुधवार दि. १९ रोजी सकाळी पंचामृती पूजा व अभिषेक, सकाळी ८.३० वा. श्रीराम, सीता, श्री विठ्ठल रखुमाई, श्री हनुमान मूर्ती वर्धापन दि, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता ह. भ. प. प्रसन्न जोशी यांचे कीर्तन व राळी ९ वाजता भजन होणार आहे. गुरूवार दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता ‘श्री गजानन विजय ग्रंथ’ पारायणास सुरूवात होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 15/Feb/2025