चिपळूण : कोकणात दुग्ध क्रांती घडवणाऱ्या वाशिष्ठी डेअरीचा अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित कीर्तन महोत्सवात गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांना दुग्ध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मराठा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आ. सुभाष बने, शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, महोत्सवाचे उद्घाटक न्यायाधीश राजेश घाणेकर, उपाध्यक्ष संतोष नानावटे, विभागीय अध्यक्ष अप्पा खैर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, शिवसेना शहरप्रमुख शशिकांत मोदी यांसह अनेकजण उपस्थित होते. यावेळी मराठा महासंघाच्या वतीने इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 15/Feb/2025














