रत्नागिरी : नदी संवर्धन, चला जाणूया नदीला अशा उपक्रमातून नद्या स्वच्छतेचा उपक्रम ठिकठिकाणी सुरू आहे; परंतु तालुक्यातील सोमेश्वरमध्ये असे काही उपक्रम सुरू आहेत हे कोणालाही माहिती आहेत का ? असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. सोमेश्वर पुलाखाली आणि त्याच्यापुढे नदीकिनारी प्रचंड प्लास्टिक पिशव्यांचा, बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे.
नदी संवर्धनासारखे उपक्रम राबवून कांदळवन सफारीसारखे उपक्रम राबवले जात असताना अशा प्रकारचा प्लास्टिकचा खच नदी संवर्धनात अडथळे ठरणारा आहे. सोमेश्वर पुलाखाली आणि नंतर जेटीजवळ असलेले प्लास्टिक आणि कचरा थेट नदीपात्रात जात असून, त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. याकडे गांभीर्याने ग्रामपंचायतीसह नागरिकांनीही सजग राहून लक्ष देणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 15-02-2025













