रत्नागिरी : रत्नागिरी Ratnagiri तालुक्यातील टेंभ्ये येथील काजळी नदी किनारी प्रातःविधी करण्यासाठी गेलेले असताना बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह बुधवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. सुमारास नदीपात्रात मिळून आला. शरद लहू नागवेकर (६९, रा. हातिस, रत्नागिरी) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत त्यांचा मुलगा संकेत शरद नागवेकर (३३, रा. हातिस, रत्नागिरी) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, मंगळवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.१५ वा. सुमारास शरद नागवेकर हे प्रातःविधी करण्यासाठी टेंभ्ये गावी कोसुंबी वाडी जवळील काजळी नदी किनारी गेले होते. परंतु दुपारी उशिरापर्यंत ते घरी परतले नव्हते. त्यांनी याबाबत ग्रामीण पोलिसांनाही खबर दिली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 03-10-2024