Bigg Boss Marathi Season Finale Week : बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. 6 ऑक्टोबरला यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदाच्या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सध्या विजेतापदाच्या शर्यतीत अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे सदस्य आहेत. ग्रँड फिनाले ट्रॉफी कुणाला मिळणार याकडे सर्वांच्या लागल्या आहेत. बिग बॉसच्या घरात आज मिड वीक इविक्शन पार पडणार आहे.
बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच होणार मिड वीक एलिमिनेशन
बिग बॉस मराठीने आजच्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये बिग बॉसच्या घरात आज डीजे क्रेटेक्स येणार असल्याचं दिसत आहे, त्याशिवाय आज मिड वीक इविक्शन होणार असल्याचंही बिग बॉस सांगत आहेत. गेल्या आठवड्यात पॅडी कांबळेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला तेव्हा बिग बॉसने घोषणा केली होती की, या आठवड्यात मिड वीक एलिमिनेशन होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 03-10-2024










