खानू मावळंकरवाडी येथील घरफोडीत दागिने लंपास

रत्नागिरी : तालुक्यातील खानु मावळंकरवाडी येथील घराच्या मागील दरवाजातून घरात प्रवेश करत अज्ञाताने सोन्याचे ७१ हजार ३८० रुपयांचे दागिने लांबवले. चोरीची ही घटना नोव्हेंबर २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडली.

या बाबत संतोष महादेव मावळंकर (५०, रा. खानू मावळंकरवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञाताने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असताना त्याव्दारे घरात प्रवेश करुन ७१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 17/Feb/2025