चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग कामात नव्याने तयार करण्यात आलेले अंतर्गत रस्ते, गटारे व क्रॉसिंग अपघातास निमंत्रण देत आहेत. शहरालगतच्या कळंबस्ते येथील ग्रामस्थांनी या प्रश्नावर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयावर धडक दिली आणि या समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर कळंबस्ते येथील क्रॉसिंग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. कळंबस्ते नाका येथे महामार्गावर तयार करण्यात आलेल्या क्रॉसिंगमुळे येथे अपघात सत्र सुरू आहे.
या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा जाण्यासाठी असलेला अंडरपास हा सोयीचा असून क्रॉसिंग कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रश्नी सामाजिक कार्यकर्ते संजय गमरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय जाधव, रिक्षा संघटनेचे संतोष शिगवण, सुरेश खेराडे, विलास शिरगावकर, नंदू राक्षे, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर कळंबस्ते येथील क्रॉसिंग पिंप टाकून तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 17/Feb/2025














