खानूत घरातून ७० हजाराचा ऐवज चोरी

रत्नागिरी : तालुक्यातील खानू मावळकरवाडी येथे घरातील ७० हजाराचा ऐवज चोरट्याने चारुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष महादेव मावळकर (५०, रा. खान मावळंकरवाडी) यांनी या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
चोरीला गेलेल्या मुद्देमालात सोन्याचे जुने मंगळसुत्र, सोन्याचे पेंडल, ७सोन्याच्या अंगठ्या, दोन कानातील झुमके जोड आदींचा समावेश आहे. १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मावळकर यांच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता. याचा फायदा उठवत चोरट्याने घरात प्रवेश केला. तसेच घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने चोरुन नेले, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.