रत्नागिरी : जिल्ह्यातील गावोगावच्या पाणी स्रोतांची होणार तपासणी

रत्नागिरी : गुईलेन बरे सिंड्रोममुळे (जीबीएस) दुषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याने जिल्ह्यामधील पाण्याचे स्त्रोत तपासण्यात येणार आहेत. पाणी तपासणीसाठी अभियान राबवले जाणार आहे. तसेच, तपासणीमध्ये निष्काळजीपणा आढळून आल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, ७ हजार ७९० पाण्याचे स्त्रोत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात जीवीएसचे रुग्ण आढळून आले नसले तरी राज्यातील अन्य जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना पोटदुखी, जुलाब व डायरियाचा त्रास झाल्याचे समोर आले
आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातही डायरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. पाणी पिण्यास अयोग्य तर काही ठिकाणी घरातील पाण्यामध्ये क्लोरिनचे आहे. प्रमाण शून्य टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला जीबीएम आणि साथरोगांचा प्रादुर्भाव वर्षातून दोन वेळा रासायनिक तपासणी
साथरोगांना आळा बसावा म्हणून सुद्ध पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक गावातील घरांमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे.

कमी करण्यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पाणीपुरवठा करावा, असे आदेश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने काढले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुद्धा सर्व ग्रामपंचायतींना याबाबत आदेश काढले आहेत. याची अंमलबजावणी संबंधित गटविकास अधिकारी यांनी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायती असून, त्यामध्ये ७ हजार ७९० पाणी खोत आहेत. यामुळे या सर्वांची तपासणी करावी लागणार आहे.

काय आहे आदेश ?
बीबीएसच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषद कार्यालयांनी प्रत्येक गावांमधील नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी, नळाद्वारे परांमध्ये उपलब्ध होणारे पाणी यांचे नमुने गोळा कराचे, प्रयोगशाळेने तातडीने तपासणीचा अहवाल जिल्हा परिषदेकडे द्यावा, अन्नाची तपासणी, पाणी तपासणी, पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता, पाणीपुरवठ्यामधील गळती रोखण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 17/Feb/2025