राजापूर : गेले काही महिने शहरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिक, व्यापारी यांच्यात भीतीचे वातावरण असताना मंगळवारी सायंकाळी ७च्या सुमारास शहरातील रुमडेवाडी भागात बिबट्याचे दर्शन झाले. या बिबट्याने अभिजित पवार यांच्या कुत्र्याची शिकार केल्याची माहिती पुढे आली आहे. या भागातील नागरिक नंदकिशोर आंबोळकर यांनी या बिबट्याला पाहिले असून बिबट्याच्या संचाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आता पुन्हा एकदा मंगळवारी रूमडेवाडी भागात या बिबट्याचे दर्शन झाले असून त्याने कुत्र्याची शिकार केली. रूमडेवाडी ते जकातनाका परिसर हा जंगलमय असून या भागात खूप झाडीझुडपे वाढली आहेत. त्यामुळे या भागात कायमच बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जाते. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.














