देवरूख पंचायत समितीच्या कार्यालयात ‘सप्तलिंगी नदी परिषद’

देवरूख : नदी म्हणजे संस्कृती, नदी संवर्धन हा जगण्याचा, संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे. नदीला आईचे रूप मानतात. उत्तरेत तर गंगेला ‘गंगा मैया’ असेच म्हटले जाते. आपल्या गावातून वाहणाऱ्या या नदीची म्हणजे आपल्या ‘आईची’ दुर्दशा आपण उघड्या डोळ्याने पाहात असतो. या प्रश्नाकडे समाजाचं आणि शासनाचे लक्ष वेधण्याकरिता संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पंचायत समितीच्या कार्यालयातील सभागृहात ‘सप्तलिंगी नदी परिषद ‘शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.

देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर आणि संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फॉर्मफ्रेश प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे विलास शेलार यांच्या पुढाकाराने या राऊंड टेबल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या हरपुडे या गावात सप्तलिंगी नदीचा उगम होतो. उगमापासून ते बांद्री गावाच्या शेवटपर्यंत या नदीचा ३३ किलोमीटरचा प्रवास होतो. या प्रवासात १८ गावातील सप्तलिंगी नदीवर मार्लेश्वर, वाडेश्वर, निळकंठेश्वर, आकार वाकोबा, काशीविश्वेश्वर, दुबळेश्वर, रामेश्वर, सांब, सोमेश्वरची दोन ठिकाणे, चंद्रेश्वर, हरिहरेश्वर अशा या अठरा गावांतील ही बारा शिवलिंग आहेत, असे निखिल कोळवणकर नदीला घेऊन छोटे-छोटे इव्हेंट करावे लागतील.

नदी किनारी जमिनीची धूप थांबणारी झाडे लावावी लागतील. छोटे-छोटे बंधारे बांधून पाणी अडविले पाहिजे आणि त्या पाण्यावर शेती पूरक उद्योग सुरू केले पाहिजे. आमदार, खासदार राज्यकर्ते यांची मदत घेऊन नदी संवर्धनाची ही चळवळ पुढे नेली पाहिजे. ही परिषद ही सुरुवात असल्याचे निखिल कोळवणकर आणि विलास शेलार यांनी सांगितले. या परिषदेला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

गंगा नदीप्रमाणेच सप्तलिंगी नदीचे मोल
ही नदी संवर्धनाची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आता या गावातील लोकांची आहे. त्यासाठी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कार्यक्रम आखले पाहिजे. गंगा नदीचे जे मोल आहे तेच या आपल्या गावातून वाहणाऱ्या नदीचे आहे, याचे भान जागवायला हवे. त्यातून नदीच्या किनारी वसलेल्या गावची संस्कृती आपल्या आणि मुलाबाळांपर्यंत पोहोचवता येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 17/Feb/2025