संगमेश्वर : गोव्याहून संगमेश्वरच्या दिशेने जाताना मोबाईलवरील लोकेशनवरून शॉर्टकट मारण्याच्या नादात उक्षी घाटात कंटेनर अडकल्याच्या घटना गेल्या चार ते पाच महिन्यांत घडल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून या घाटातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने या मार्गावर दोन्ही बाजूला फलक लावून अवजड वाहतूक बंद केली आहे.
हा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा आणि चढ- उताराचा आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने अनेकजण उक्षीमार्गे रत्नागिरीत येण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. मात्र हा मार्ग अरुंद असल्याने अवजड वाहने वळणावर अडकतात आणि वाहतूक कोडी होते.
ही काढण्यासाठी अडकलेली वाहने ग्रामस्थांसह वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागते. याचा फटका ग्रामस्थांसह वाहनचालक, गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांनाही बसतो.
त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक थांबवावी अशी मागणी उसी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने उक्षी घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असणारे फलक दोन्ही बाजूने लावले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 17/Feb/2025














