लांजा : झाडांच्या संरक्षणासाठी अमर खामकरांची धडपड

पावस : वणवा लागून झाडांचे नुकसान होऊ नये, म्हणून लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतिशील शेतकरी अमर खामकर यांनी काम हाती घेतले आहे. झाडांच्या सभोवतालचे सुकलेले गवत समुळं नष्ट करण्यासाठी ते राबताना राबताना दिसत आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलीकीचे कौतुक होत आहे. त्यांनी ५०० झाडांची लागवड व संगोपन केले आहे. शेती हा व्यवसाय निवडून त्यातूनच उदरनिर्वाह करत वाटूळ-दाभोळे मार्गावर ५०० झाडांची लागवड केली.

या झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करण्याचे कामही खामकर करत आहेत. तसेच गावातील शाळेचा परिसर, स्मशानभूमी तसेच रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडी ग्रास कटिंगच्या माध्यमातून साफ करण्याचे समाजोपयोगी कार्य ते करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 17/Feb/2025