खेड : आंबये येथे वणव्यात काजू बागायती जळून खाक

खेड : तालुक्यातील आंबये गावातील सकपाळ वाडी परिसरात १६ रोजी दुपारी १.३२ वाजताच्या सुमारास अचानक वणवा लागून संपूर्ण आंबा बाग व काजू बागा होरपळून गेल्या. ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने गावकऱ्यांसह खेड पोलिस ठाण्याचे पोलिसही मदतीला धावून आले तर खेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

दिपक देवळेकर – फायरमन, विद्याधन पवार वाहन चालक, जयेश पवार -सहायक फायरमन, प्रणव रसाळ, प्रणय घाग या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आग आटोक्यात आणली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, वणवा लागण्यास मागचे कारण समजुन येत नाही. मात्र, याबाबतच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 18/Feb/2025