रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

रत्नागिरी : जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद आरोग्य विभागाने पटकाविले. त्यांना फिरता चषक देऊन गौरव करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे एकोणतिसावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

याअंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी केली क्रिकेट पुरुष गटाचे विजेतेपद, क्रिकेट पुरुष (45+) उपविजेतेपद, व्हॉलीबॉल विजेतेपद, क्रिकेट महिला उपविजेतेपद, बॅडमिंटन महिला विजेतेपद, कॅरम एकेरी महिला विजेतेपद, कॅरम दुहेरी महिला विजेते व उपविजेतेपद, कॅरम मिश्र उपविजेतेपद, २०० मीटर धावणे विजेतेपद, ४०० मीटर धावणे उपविजेतेपद, लांब उडी विजेतेपद, कॅरम दुहेरी उपविजेतेपद आरोग्य विभागाने पटकाविले. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्हा परिषद सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक पटकावला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि सर्व खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 18-02-2025