लांजा : तालुक्यातील भांबेड येथील महावितरण कंपनीचे सबस्टेशनच्या बाजूला स्पार्क झाल्याने आग लागल्यामुळे आजूबाजूचा परिसरासह अभिजित गांधी याची काजू कलमाची बाग, महावितरण कंपनीची ३३ केव्हीची वायर जळून मोठे नुकसान झाले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राजापूर येथून अग्निशमन बंब बोलवण्यात आले; परंतु बंब येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व काही जळून खाक झाले. या आगीत १५ लाखांचे नुकसान झाले आहे.
रविवारी (ता. १६) दुपारी बारा वाजता भांबेड येथील सबस्टेशनच्या बाजूला स्पार्क झाल्याने आग लागली. आजुबाजूला असणाऱ्या गवताने पेट घेतला. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राजापूर येथून अग्निशमन बंब बोलावण्यात आला. तासाभरात दुपारी एक वाजता बंब सबस्टेशन भांवेड येथे दाखल झाला. गवत असल्याने हा हा म्हणता आगीने रौद्र रूप धारण केले. बंब दाखल होण्यापूर्वीच अभिजित गांधी याची काजूची बाग जळून खाक झाली. यामध्ये गांधी यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महावितरण अधिकारी, माजी नगरसेवक राजू हळदणकर, ग्रामस्थ उपस्थित होते. अग्निशमन बंब असता तर आगीपासून होणाऱ्या नुकसानीचा बचाव करता आला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 18/Feb/2025














