Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’चे राज्यातील जिल्हानिहाय अर्ज आणि मंजूर अर्ज

पुणे : लाडकी बहीण योजनेसाठी Ladki Bahin Yojana अखेरच्या दिवसापर्यंत २ कोटी ५२ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. २३ लाख ४० हजार महिलांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने १५०० रुपयांचा लाभ मिळाला नाही.

त्यांच्या घरी जाऊन आधार संलग्न करण्याच्या सूचना महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिल्या. महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

३० सप्टेंबरअखेर २ कोटी ४१ लाख ३५ हजार ६५७ अर्जाना मान्यता देण्यात आली असून, ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी संलग्न नाही त्यांना आधार जोडण्याच्या सूचना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या घरी पाठवा, अशी सूचना तटकरे यांनी केली.

राज्यातील जिल्हानिहाय अर्ज आणि मंजूर अर्ज

जिल्हाअर्जमंजूर अर्ज
नगर११९००४३११४६२०८
संभाजीनगर९६२६४०९३८८७२
धाराशिव४०२१४७३८१८८१
धुळे५००७८३४८२५१०
गडचिरोली२५९४४२२५२४१८
गोंदिया३६००३६३५१७६८
हिंगोली३१२९२८३००२७६
जळगाव९१४७७३९६३८६१
जालना५१९२९३४८७४९३
कोल्हापूर१०१८८२४१००१५५३
लातूर५६६३६९५४२६५३
मुंबई शहर४३०५९७३८३७८५
मुं. उपनगर१०६३७५७९७७३३८
नागपूर१०६४२७८१०२६३२८
नांदेड८४१४४२८००५४४
नंदुरबार४१९०८६४०६८३१
नाशिक१४८६४१३१४३५६६७
पालघर६११२६३५२३६४५
परभणी४४९९३६४३०६१३
पुणे१९८६५८६१९०६०२३
रायगड५९९६१४५८२०४०
रत्नागिरी४१३१६७३९५७९२
सांगली७४६४०८७१८९१८
सातारा८०९००२४८७४९३
सिंधुदुर्ग२०५१८५१९४४८०
सोलापूर१०६३६६३१००७८७९
ठाणे१३.६६,७५९१२९६४०२
वाशिम३१५८५६७०२३७७
वर्धा३१४३०२३०२७६४
यवतमाळ७०२३७७६८२२२४
एकूण राज्य२५२०१९७५२४१३५६५७

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 03-10-2024