चिपळूण : आम्ही सारे शिवप्रेमी व क्षात्रवीर संभाजी क्रीडा व युवक प्रतिष्ठान आयोजित जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व युवराज संभाजीराजे मित्रमंडळ संयोजित राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केली आहे.
वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डमध्ये नोंद असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव अभिनव स्पर्धा आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण यांनी केले आहे.
स्पर्धेचे हे दशकपूर्ती वर्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी आग्रा भेट (जिजाऊ शिवराय भेट प्रसंग), प्रतापगड रणसंग्राम, छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मावळे हे विषय ठेवले आहेत. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, ११ हजार, ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देण्यात येणार आहे. याबरोबरच दशकपूर्ती वर्षानिमित्त ११ हजार रुपयांची विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. डॉ. तुषार देशमुख यांची ही संकल्पना तथा मुख्य संयोजक आहेत.
स्पर्धेत सहभागी मावळ्यांनी आयोजकांनी दिलेल्या कोणत्याही एका विषयावर आपल्या घरी शिवरायांच्या मूर्ती किंवा फोटोचे पूजन करून आकर्षक व नावीन्यपूर्ण सजावट १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान करावी. सजावटीचे कोणतेही तीन फोटो आपल्या कुटुंब, शेजारी व मित्रमंडळींसह काढून संयोजकांच्या व्हॉटस्अॅपवर पाठवावे. त्यात संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबरसह टाकावा. व्हिडिओ जास्तीत जास्त
दोन मिनिटांचा असावा. अशी अट घालण्यात आली आहे.
उत्कृष्ट अशाच सजावटीचे परीक्षण करण्यासाठी आयोजकांचे प्रतिनिधी तीन दिवसांत घरी येणार आहेत. स्पर्धेत अ गट ५ ते १६ वर्षे, व गट १७ते ३० अशा दोन गटांत मावळ्यांना सहभागी होता येईल. राज्यस्तरावर उत्कृष्ट आठ स्पर्धकांना दोन गटात विभागून सर्व बक्षिसे देण्यात येतील. अधिक माहितीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 18/Feb/2025














