रत्नागिरी : कृषिपूरक व्यवसाय Agricultural News पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शेळी- मेंढीपालन योजना सुरु करण्यात आली आहे.
अनेक लोकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून ते शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतात. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे शेळी व मेंढी खरेदी करू शकत नाही. या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने शेळी-मेंढीपालन योजना कृषिपूरक योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत शासनाकडून ७५ टक्के अनुदान मिळणार असून, लाभाथ्यर्थ्यांनी २५ टक्के भरावयाचे आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 03-10-2024














